Home ठळक बातम्या महिला दिनानिमित्त अग्रवाल कॉलेजतर्फे ‘मैत्रिण’ हेल्पलाईनचा शुभारंभ

महिला दिनानिमित्त अग्रवाल कॉलेजतर्फे ‘मैत्रिण’ हेल्पलाईनचा शुभारंभ

कल्याण दि.8 मार्च :
आज असणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कल्याणातील के.एम. अग्रवाल कॉलेजतर्फे ‘मैत्रिण’ हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला. या हेल्पलाईनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनींना समुपदेशनाचे काम केले जाणार आहे.

आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात गगनभरारी घेतलेल्या महिलांचा अग्रवाल कॉलेजतर्फे सन्मान करण्यात आला. ज्यात गटविकास अधिकारी श्वेता पालवे, चित्रकार रेखा भिवंडीकर, महाराष्ट्र टाईम्सच्या प्रतिनिधी राजलक्ष्मी पुजारे-जोशी, बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापक रेखा खैरनार, उद्योजिका मनिषा कांदळगावकर, तहसिल कार्यालयातील पुरवठा अधिकारी सीमा दूतारे, आर्किटेक्ट दिपा रत्नाकर आदी कर्तृत्ववान महिलांचा समावेश होता. या सर्व महिलांनी विविध विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.

दरम्यान या सोहळ्यातील विशेष क्षण ठरला तो ‘मैत्रीण’ हेल्पलाईनचा उद्घाटन सोहळा. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्याद्वारे विविध समस्या किंवा वैयक्तीक प्रश्नांवर समुपदेशन करण्यात येणार आहे. आपल्या शालेय विद्यार्थीनींसाठी अशी हेल्पलाईन सुरू करणारे अग्रवाल हे बहुधा पहिलेच कॉलेज असावे.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला कॉलेजच्या प्राचार्या अनिता मन्ना, उपप्रचार्या डॉ. अनघा राणे, महेश भिवंडीकर, प्रा. मीनल सोहनी आदींसह विविध शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*