Home Uncategorised कल्याणातील बहुचर्चित ‘रंगीलो नवरात्रौत्सवा’ला शानदार सुरुवात

कल्याणातील बहुचर्चित ‘रंगीलो नवरात्रौत्सवा’ला शानदार सुरुवात

कल्याण दि.10 ऑक्टोबर :
कल्याण शहरातील बहुचर्चित अशा ‘रंगीलो’ नवरात्रौत्सवाला आजपासून शानदार सुरुवात झालेली पाहायला मिळाली. सामाजिक कार्यकर्ते विकी गणात्रा आणि महेंद्र जैन यांच्या ग्रुपतर्फे मेट्रो मॉलमधील बॉलरूम पलाझो’मध्ये हा गरबा आयोजित करण्यात आला आहे.

या गरबा उत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘संग संगिनी’ या संस्थेच्या महिला आणि युवतींनी केलेला देखणा गरबा सर्वांचे आकर्षण ठरला. संस्थेच्या अनेक सदस्यांनी पारंपरिक पोशाखात आणि पारंपरिक पद्धतीने हा गरबा खेळत ‘रंगीलो’चा पहिला दिवस गाजवला. विशेष म्हणजे संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेला हा गरबा तब्बल 4 तास म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत त्याच जोशात आणि जल्लोषात खेळला जात होता.

 

त्यानंतर काही वेळाने रंगीलोच्या दुसऱ्या भागाला सुरुवात झाली. ज्यामध्ये अनेक युवक, युवती आणि आबालवृद्ध उत्साहात सहभागी झालेले पाहायला मिळाले. तर डीएनआर एंटरटेनरच्या गायक आणि गायिकांनी सादर केलेल्या एकाहून एक सरस अशा गाण्यांवर आणि त्यांना उत्कृष्ट साथ देणाऱ्या वाद्यवृंदाच्या तालावर गरबाप्रेमींची पावले थिरकली नसती तर नवल. तर या गरबामध्ये उत्कृष्ट गरबा नर्तक, उत्कृष्ट पोशाख करणाऱ्या गरबा प्रेमींना गोल्ड ज्वेलरी, कॉइन, कॅश व्हाउचर आदी भरघोस बक्षिसांनी निवडक गरबा प्रेमीनींना गौरवण्यात आले.

या गरबा उत्सवाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, भाजप कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत ‘रंगीलो’च्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतूक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*