Home क्राइम वॉच डोंबिवलीत एका दुकानातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त

डोंबिवलीत एका दुकानातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त

डोंबिवली दि.16 जानेवारी :

डोंबिवली दि.16 जानेवारी :

फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराला कल्याण क्राईम ब्रॅंचने अटक केली आहे. धनंजय कुलकर्णी (वय 49 वर्ष) असे या दुकानदाराचे नाव असून तो भाजपचा पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मानपाडा रोड परिसरात असणाऱ्या तपस्या हाऊस ऑफ फॅशन या नावाच्या दुकानातून धनंजय फॅशनेबल वस्तूंची विक्री करतो. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दुकानात धाड टाकली. रात्रभर दुकानाची झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांनी 62 स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स, 38 बटनचाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोयता आणि एक एयरगनसह मोबाइल आणि काही रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आहे. ही शस्त्र नेमकी कोणत्या कारणासाठी आणली होती याचा तपास क्राईम ब्रँच करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*