Home कोरोना कल्याण डोंबिवलीत महापालिकेतर्फे उद्याही (5जुलै) लस नाहीच

कल्याण डोंबिवलीत महापालिकेतर्फे उद्याही (5जुलै) लस नाहीच

 

कल्याण डोंबिवली दि.4 जुलै :
गेल्या आठवड्यात जेम तेम 2 दिवस लसीकरण झाल्यानंतर आता उद्यापासून (5 जुलै) सुरू होणाऱ्या नव्या आठवड्याची सुरुवातही निराशाजनकच होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्याही लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात केवळ सोमवारी आणि शनिवारी असे दोनच दिवस लसीकरण सुरू होते तर उर्वरित लागोपाठ 4 दिवस लस नसल्याने लसीकरण बंद होते. आता उद्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा हाच कित्ता गिरवला जात असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा