Home ठळक बातम्या कल्याण पूर्व – पश्चिमेचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी राहणार १२ तास बंद

कल्याण पूर्व – पश्चिमेचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी राहणार १२ तास बंद

कल्याण दि.15 सप्टेंबर :

कल्याण पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी 20 सप्टेंबर रोजी १२ तास बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका पाणी पुरवठा डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही माहिती दिली आहे.

केडीएमसीच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत आणि यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे 20 सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कल्याणमध्ये पाणी पुरवठा होणार नसल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात आले आहे.

मागील लेखविविध प्रश्नांवर शासनाकडून दखल घेतली जात नसल्याविरोधात कल्याणात शिक्षण अभ्यासकाचे आत्मक्लेश उपोषण
पुढील लेखकेडीएमसीचे ट्विटर हॅण्डल काही तासांसाठी हॅक ; पोलीस तपास सुरू

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा