Home ठळक बातम्या मतदान वाढीसाठी आता कल्याण ‘आयएमए’चाही पुढाकार ;सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन

मतदान वाढीसाठी आता कल्याण ‘आयएमए’चाही पुढाकार ;सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन

कल्याण दि.17 एप्रिल :
आपल्या आरोग्याची काळजी घेणारी डॉक्टर मंडळी आता ‘लोकशाहीच्या सुदृढ’ आरोग्यासाठीही पुढे सरसावली आहेत. लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ‘इंडियन मेडीकल असोसिएशन’ कल्याण शाखेनेही (आयएमए) पुढाकार घेतला आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी आपल्या देशाची ओळख आहे. सर्वात मोठी लोकशाही आणि या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या निवडणुकीत मात्र म्हणावे तेवढे मतदान होताना दिसत नाही. या मुद्द्यावर प्रत्येक निवडणुक काळात निवडणूक आयोग मतदान वाढावे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. यंदाच्या निवडणुकीतही निवडणूक आयोग आणि विविध शासकीय यंत्रणा मतदान वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यासाठी आता ‘आयएमए’ सारख्या देशातील डॉक्टरांची नामांकित आणि मोठ्या संघटनाही पुढे सरसावल्याची माहिती कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेत आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिमेत* ‘आयएमए’ निवडणूक आयोगाच्या खांद्याला खांदा लावून मतदान जागृतीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेत ठिकठिकाणी ‘आयएमए’ने मतदान जनजागृतीसाठी बॅनर लावले आहेत. ‘सबसे बडा दाता… भारत का मतदाता…, “29 एप्रिलला मतदान करून लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव साजरा करा” अशा आशयाचा जनजागृतीपर संदेश या बॅनरमधून देण्यात आल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

“मतदान न केल्यामुळे काय नुकसान होते ते आपल्या सर्वांना माहिती आहे. तसेच मतदान न केल्यास लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारायचा आपला अधिकारही आपण गमावून बसतो. त्यामूळे लोकशाही बळकट करण्यासाठी, चांगला देश घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे.”

*- डॉ. प्रशांत पाटील, सचिव, कल्याण आयएमए*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*