Home ठळक बातम्या कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या झंझावाती प्रचाराला प्रारंभ  

कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या झंझावाती प्रचाराला प्रारंभ  

कल्याण दि.12 एप्रिल :
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात झंझावाती प्रचाराला प्रारंभ केला आहे. कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्वेत प्रचारफेरी दरम्यान त्यांनी कल्याणवासीयांशी तसेच उल्हासनगर येथील मराठा सेक्शन येथे महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे आयोजित खान्देश मेळाव्यात सहभागी होत मतदारांशी संवाद साधला.

कल्याण पूर्व भागातील एफ केबिन फाटक, शिवाजी नगर, वालधुनी, बुद्धविहार, शिवाजी महाराज पुतळा, अंबरनाथ रोड, अशोक नगर गेट, पाठारे बुद्धविहार, उर्दू शाळा, कल्याण रोड, इंदिरा नगर, आंबेडकर चौक, रेल्वे कॉलनी या मार्गे डॉ. शिंदे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे अनेक कार्यकर्ते आणि महिलादेखील मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यामध्ये महापौर विनिता राणे, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, प्रकाश पेणकर, दशरथ घाडीगावकर,, महायुतीचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तर डोंबिवली पूर्व येथील शिवसेना व भाजपच्या विविध नगरसेवकांच्या प्रभागात प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शिंदे यांनी यावेळी शैलेश धात्रक, विद्या म्हात्रे, रेखा म्हात्रे, विकास म्हात्रे, प्रकाश भोईर, वृषाली जोशी, गुलाब म्हात्रे, संगीता पाटील आदी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. त्यांच्या समवेत महापौर विनिती राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, नगरसेवक विश्वनाथ राणे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, रमेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

तसेच उल्हासनगर येथे आयोजित खान्देश महोत्सवातही डॉ. शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधून उल्हासनगरच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सव्वाशे कोटी रुपयांच्या रुग्णालयाचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*