Home ठळक बातम्या शिक्षण क्षेत्रात कल्याण पॅटर्नची वेगळी ओळख निर्माण होणार – खासदार कपिल पाटील

शिक्षण क्षेत्रात कल्याण पॅटर्नची वेगळी ओळख निर्माण होणार – खासदार कपिल पाटील

 

कल्याण दि.31 मे :
कल्याण शहराची ऐतिहासिक शहर अशी ओळख असली तरी नरेंद्र पवार यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे लवकरच कल्याणही शिक्षणाची पंढरी होणार असून कल्याण पॅटर्नची वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. माजी आमदार-भाजपा भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार यांनी ११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या जेईई, नीट, सीईटी प्रवेश परीक्षा ऑनलाईन टेस्ट सिरीज उपक्रमाचे उद्घाटन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी या उपक्रमाची उपयुक्तता सांगून प्रवेश परीक्षेच्या सरावासोबतच विद्यार्थ्यांना मिळणारे मार्क्स, त्याने केलेल्या चुका, त्याची कारणे या उपक्रमाच्या माध्यमातून लगेच दिसणार असल्याचे सांगितले.

तर या उपक्रमाचे आयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विविध कॉलेज, क्लासमधील तसेच कल्याणमध्ये राहणारे वा इतरत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी कोणतेही शुल्क न देता मोफतपणे या टेस्ट सिरीजचा लाभ घेऊ शकतील. तसेच या सिरीजमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकरणांवर आधारित टेस्ट उपलब्ध होणार असून विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनही लाभणार असल्याचे पवार म्हणाले. यासाठी विद्यार्थ्यांनी www.narendrapawar.com या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कल्याणमधील अचिवर्स महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे, आचिवर्स शाळा व महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ महेश भिवंडीकर, कोषाध्यक्ष गौरांग भिवंडीकर, के एम अग्रवाल कॉलेजचे कोषाध्यक्ष दिनेश सोमाणी, समाजसेवक राजू गवळी स्थानिक नगरसेवक सचिन खेमा, महिला आघाडी प्रदेश सचिव प्रिया शर्मा तसेच ज्योतिताई भोईर, नवनाथ पाटील , नम्रता चव्हाण, सदा कोकणे, कल्पना पिल्ले, मदनभाई शंकलेशा, उमेश पिसाळ, रेणू ठाकूर, विशाल शेलार उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री अकुल तर आभार प्रदर्शन अनंत किनगे यांनी केले. या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख महेश सावंत, शिक्षण क्रांती संघटनेचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष गजानन पाटील, ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष शेखर कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा