Home ठळक बातम्या रक्तदान शिबिरात मोठया संख्येने सहभागी होण्याचे कल्याण रोटरी क्लबचे आवाहन

रक्तदान शिबिरात मोठया संख्येने सहभागी होण्याचे कल्याण रोटरी क्लबचे आवाहन

कल्याण दि.14 ऑगस्ट :
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडचे अध्यक्ष संतोष दरंगे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
कल्याणातील स्प्रिंगटाईम क्लबमध्ये सकाळी 9 ते 2 हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रोटरी क्लब रिव्हरसाईडसोबतच कल्याणातील रोट्रॅक्ट क्लब आणि इनर्व्हिल क्लब या संस्थांचीही त्याला साथ लाभली आहे. सध्या असणारी रक्ताची गरज पाहता अधिकाधिक रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन माजी अध्यक्ष रोटेरियन वैभव ठाकरे यांनी केले आहे…

मागील लेखकेडीएमसी क्षेत्रात उद्या (14ऑगस्ट) 26 ठिकाणी लसीकरण ; कोवीशिल्डचे डोस मिळणार
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 54 रुग्ण तर 66 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा