Home ठळक बातम्या रंगीलो नवरात्री ‘ दिवस 7 वा…

रंगीलो नवरात्री ‘ दिवस 7 वा…

कल्याण दि.17 ऑक्टोबर :
गरबाप्रेमींचा सर्वात फेव्हरेट गरबोत्सव ठरलेल्या कल्याणातील ‘रंगीलो’ची गरबाप्रेमींवरील जादू काही अद्याप कायम असल्याचे दिसत आहे. गरबोत्सवाच्या सातव्या दिवशीही गरबाप्रेमींनी केलेली अलोट गर्दी त्याचीच साक्ष देत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते विकी गणात्रा आणि महेंद्र जैन यांच्या ग्रुपने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या नवरात्री उत्सवाला गरबाप्रेमी अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचत आहेत. याठिकाणी गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या गर्दीचा दररोज नवनविन उचांक होत असून गरबा खेळणाऱ्यांच्या संख्येपुढे हा भलामोठा हॉलही तोकडा पडू लागला आहे. यावरूनच या रंगीलोची लोकांमध्ये असणारी क्रेझ दिसून येत आहे. लोकांना एखादा दर्जेदार कार्यक्रम दिला तर लोकं त्याला कसा सकारात्मक प्रतिसाद देतात हेच या गरबोत्सवाला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादातून सिद्ध झाले आहे.

 

उत्कृष्ट ग्रुपकडून उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन त्यामध्ये उत्कृष्ट वाद्यवृंद आणि त्याला लाभलेली उत्कृष्ट गरबाप्रेमींची साथ असं या रंगीलोचे थोडक्यात वर्णन करावे लागेल.

रंगीलोच्या सातव्या दिवशी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, मनसे कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, नगरसेविका कस्तुरी देसाई आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत या गरब्याचे विशेष कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*