Home ठळक बातम्या अखेर शंभर वर्षे जुना पत्रीपुल झाला इतिहासजमा

अखेर शंभर वर्षे जुना पत्रीपुल झाला इतिहासजमा

 

कल्याण दि.19 नोव्हेंबर :

पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा १०४ वर्षे जुना धोकादायक पत्रिपुल तोडण्याच्या कामाला सकाळी सुरवात झाली होती. या कामासाठी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 असा सहा तासांचा जम्बोब्लॉक रेल्वे प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला होता. मात्र वेळे आधीच हे काम पूर्ण करण्यात आले.

पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा १०४ वर्षे जुना धोकादायक पत्रिपुल तोडण्याच्या कामाला सकाळी सुरवात झाली होती. या कामासाठी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 असा सहा तासांचा जम्बोब्लॉक रेल्वे प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला होता. मात्र वेळे आधीच हे काम पूर्ण करण्यात आले आणि दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी पहिली मेल मुबंईच्या दिशेने रवाना झाली. वाराणसी ही मेल असून या पाठोपाठ काही वेलाने लोकल सुद्धा सोडण्यात आली. दरम्यान सकाळी 9.30 वाजता ब्लॉक घेतल्या नंतर कल्याण डोंबिवली दरम्यान रेल्वे सेवा बंद ठेवली आणि पत्रिपुल दोन गर्डर भल्यामोठ्या क्रेनच्या उचलयण्यात आले. हे काम लवकर म्हणजे 12.30 वाजताच पुर्ण झाले. त्यामुळे हा रेल्वे सेवा लवकर सुरवात झाली. एव्हडे लवकर काम पहिल्यादीच झाले त्यामुळे हा एक रेकॉड आहे असे रेल्वे अधिकारी तिवारी यांनी प्रेस कॉन्फरस मध्ये सांगितले.या सर्व कामाला सुमारे 3 कोटी खर्च करण्यात आला असेही सांगितले. वाहतूक कोंडी होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवला होता. तर केडीएमटी तर्फे कल्याण –  डोंबिवली दरम्यान विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. तर वर्षभरात नवीन पूल बांधला जाईल असे खा. डॉ शिंदे यांनी सांगितले आणि पत्रिपुलची आठवणी सुद्धा माजी महापौर आणि नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी सांगितल्या. एकीकडे जुना पूल तोडला जात असताना नागरिक दुःख व्यक्त करत होते मात्र नवीन पूल लवकर करावा अशी मागणी त्यांनी केली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*