Home ठळक बातम्या पत्रीपुल, दुर्गाडीपूल युद्धपातळीवर बांधून पूर्ण करणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे

पत्रीपुल, दुर्गाडीपूल युद्धपातळीवर बांधून पूर्ण करणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण दि.28 सप्टेंबर :
नेतीवली येथील जुना झालेला पत्रीपुल तोडण्याचे काम सुरू झाले असून नविन पूल युद्धपातळीवर काम करून नविन पूर्ण केला जाईल अशी माहिती ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कल्याण पश्चिमेतील लालचौकी येथील श्री राममारुती शताब्दी सोहळयाला पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

जुना पत्रीपुल तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर युद्ध पातळीवर दुसरा नविन पूल याठिकाणी बांधण्यात येईल. तर दुर्गाडी पुलाबाबत संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला हा पुलही युद्धपातळीवर बांधण्याचे आदेश देण्यात येतील. तसेच शिळफाटा- कल्याण – भिवंडी या 6 पदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचे कार्यादेश देण्यात आले असून हे काम झाल्यानंतर कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

तर शताब्दी सोहळ्यात बोलताना संत श्री राममारुती महाराजांच्या आशिवार्दानेच आपल्याला मंत्रीपद मिळाले आणि उत्कर्ष होत गेल्याचा अनुभव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आपण राममारुती महाराजांच्या मंदिरात आलो होतो. त्यांच्याकडून आपल्याला आशिर्वाद प्राप्त झाला. नंतर आपण विरोधी पक्षनेता व आता मंत्रीपदीही पोहोचल्याचेही ते म्हणाले.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष शिरिष गडकरी , स्वागताध्यक्ष माजी महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, उत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप दळवी, प्रफुल्ल गवळी, दिपक सोनाळकर, तुषार राजे, नगरसेवक प्रकाश पेणकर, विश्वनाथ राणे, सचिन बासरे, महिला आघाडीच्या विजया पोटे, राधिका गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार…

या समारोहास उपस्थित असलेले सज्जनगडावरील संत मोहनबुवा रामदासी यांनी आपल्या भाषणात देशात हिंदुत्वाचा कणखर आवाज हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच होता, आता त्यांचे पुत्र उध्दवसाहेब तो वसा चालवित आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फक्त शिवसेनेचेच सरकार येईल असा आशावाद व्यक्त केला. नाथांचा नाथ एकनाथ असल्याने एकनाथ शिंदे यांच्या हातून गोरगरिबांची आणि हिंदुत्वाची सेवा घडेल आणि उद्याच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होतील असा आशिर्वाद दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*