Home ठळक बातम्या केडीएमसी बजेट : …या रेशनकार्ड धारकांसाठी अंत्यविधी सुविधा मोफत देण्याचा निर्णय

केडीएमसी बजेट : …या रेशनकार्ड धारकांसाठी अंत्यविधी सुविधा मोफत देण्याचा निर्णय

 

कल्याण डोंबिवली दि. 23 मार्च :
अंत्यविधीची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय केडीएमसीच्या आज सादर झालेल्या बजेटमध्ये घेण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी चालू आर्थिक वर्षासाठी कोणताही करवाढ नसणारे 2 हजार 26 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये नेहमीच्या आर्थिक तरतुदींसोबतच महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य आणि पायाभूत सुविधा वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

त्यासोबतच या बजेटमध्ये नविन आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता, घनकचरा प्रकल्प, प्राथमिक शिक्षण, क्रिडा यासह भटके आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्य सुविधांची तरतूद, पार्किंग पॉलिसी, रस्ते विकास, स्मशानभूमी, ऊर्जाक्षम पथदिवे, कचऱ्यापासून खत निर्मिती, स्मार्ट गव्हर्नन्ससाठी आदी महत्वाच्या मुद्द्यांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्य लेखा अधिकारी लक्ष्मण पाटील,  शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव, परिवहन व्यवस्थापक दिपक राऊत यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या रेशनकार्ड धारकांसाठी मोफत अंत्यविधी सुविधा
केडीएमसी प्रशासनाने यंदाच्या बजेटमध्ये मोफत अंत्यविधीची सुविधा पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी करण्यात आल्याचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मोहीम…
तर यासोबतच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठीही महापालिका प्रशासन विशेष मोहीम राबविणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत शासन नियमांच्या चौकटीत बसणाऱ्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

केडीएमसी बजेट मधील ठळक तरतुदी…
मे 2023 पर्यंत केडीएमसी क्षेत्रात शंभर टक्के ऊर्जा क्षम पथदिवे बसवणे

अधिकाधिक रस्ते आणि परिसरांचे सौंदर्यीकरण करणे

प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी विद्युत वाहिनी किंवा गॅस दाहिनी उभारणे

केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी विनाशुल्क अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करणे

कंटेनर टॉयलेट सुविधा उपलब्ध करणे

पालिका क्षेत्रातील विविध तलावांचे पुनरुज्जीवन करणे

अमृत योजनेअंतर्गत 27 गावांमध्ये पावणेतीनशे किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे विणणे

कल्याण डोंबिवली 15 नवीन जलकुंभ उभारणे

डोंबिवली शहरात चाळीस वर्षे जुन्या झालेल्या बदलून टाकणे

पंधराव्या वित्त आयोगानुसार प्राप्त निधीतून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, धुळशमन प्रकल्प, सी अँड डी वेस्ट प्रोजेक्ट उभारणे

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकत करण्यासाठी हेल्थ वेलनेस सेंटर उभारणे

नवीन प्रसूतीगृह आणि कॅन्सल सेंटर उभारणे,

कॅथलॅब – केमोथेरपी – रेडिओथेरपी केंद्र उभारणे

नवीन सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू करणे

भटक्या मांजरांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण करणे

महापालिका रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारणे

पाळीव प्राण्यांचा दवाखाना उभारणे

मान आणि पाठीच्या मणक्याच्या आजारावर उपचाराकरता केंद्र स्थापन करणे

डोंबिवलीत शवविच्छेदन केंद्र सुरू करणे

अद्ययावत रोग निदान केंद्र सुरू करणे

आधारवाडी डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी निष्कासित करण्यासाठी पुढील कार्यवाही करणे

स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी कचरा उचलण्यासह प्रक्रिया राबवणे

प्रत्येक प्रभागाकरिता एक मोबाईल टॉयलेट खरेदी करणे

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य स्टोर रूम तयार करणे

शाळांची नूतनीकरण करण्यासह डिजिटल क्लासरूम उभारणे

गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी महापालिकेचे क्रीडा संकुल नामांकित खेळाडूंना चालवण्यासाठी देण्यात येणे

महापालिकेच्या आरक्षित सर्व जागा एक वर्षाच्या आत वापरात आणणे

शंभर टक्के पेपरलेस कारभारासाठी एप्रिल 2023 पासून टप्प्याटप्प्याने ऑफिस प्रणाली राबवण्याचा निर्णय

महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वॉर रूम तयार करणे

महिलांसाठी विशेष मैदाने बनवणे

महापालिकेच्या मिळकतीमध्ये चार ठिकाणी महिला बचत गटांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणे

दरम्यान यासारख्या ठळक मुद्द्यांचा आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. आज सादर झालेले हे बजेट वाचायला आणि ऐकायला जरी चांगले वाटत असले तरी त्याची प्रत्यक्ष कितपत अंमलबजावणी होते हे लवकरच स्पष्ट होईल.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा