Home ठळक बातम्या महापालिका आयुक्तांचा कल्याण पूर्वेचा मॅरेथॉन पाहणी दौरा

महापालिका आयुक्तांचा कल्याण पूर्वेचा मॅरेथॉन पाहणी दौरा

कल्याण  दि.26 ऑक्टोबर:

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासमवेत कल्याण पूर्वेतील विविध परिसरांचा पाहणी दौरा केला. यावेळी कल्याण पूर्वेतील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आमदार गणपत गायवाड यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या.

  या पाहणी दौऱ्या दरम्यान असे दिसून आले कि कल्याण पूर्वेत कोट्यावधींच्या निधी उपलब्ध होऊनही समस्या कायमच्याच आहेत. कित्तेक आयुक्त आले आणि गेले परंतु समस्या मात्र कायमच राहिल्या. अनेक ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाहीत. कित्तेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल आहे. नाल्यांची साफसफाई ,  तलावांची दुरवस्था झालेली दिसून आली. त्यामुळे कल्याण पूर्वेत साथीच्या रोगांनी थैमान घातल आहे. हि समस्या काही नवीन नाही मात्र केडीएमसीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे या समस्या ओढवल्या असून आजच्या पाहणी दौऱ्यानंतर आमदारांनी समाधान व्यक्त करत लवकरात लवकर या समस्या महापालिका आयुक्त सोडवणार अशी आशा व्यक्त केली. तसेच आयुक्तांनी या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

    या पाहणी दौऱ्यात विट्ठलवाडी तलावाची झालेली दुरावस्था, स्मशानभूमीची दुरुस्ती करणे, माणेरा आशेळे येथील रस्त्यांची झालेली दुरावस्था, खडेगोळवली नाल्याची साफसफाई, दादासाहेब गायकवाड क्रीडांगण, कोळशेवाडी रिक्षा स्टॅण्ड ते आनंदवाडी रस्ता बनविणे, १०० फुटी रोड वर विद्युत पथदिवे बसविणे व पाण्याची लाईन टाकणे, या रस्त्या लगत असलेल्या क्रीडा संकुलाची जागा ताब्यात घेणे, ड वार्ड जवळील नियोजित  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा ताब्यात घेणे,  आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या आमदार निधीतून महापालिकेला रुग्णवाहिका दिली आहे. मात्र या रुग्णवाहिकेला चालक नसल्याने रुग्णवाहिका एकाच ठिकाणी उभी असते ही बाब देखील आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे कल्याण पूर्व आणि २७ गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे ती सोडविण्याची मागणी देखील आयुक्तांकडे करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*