Site icon LNN

केडीएमसी निवडणुक : हा QR कोड स्कॅन करा आणि मिळवा आपल्या मतदान केंद्राची माहिती

कल्याण डोंबिवली दि.11 जानेवारी:
येत्या गुरुवारी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, त्यांना आपल्या मतदान केंद्राची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेमार्फत विशेष ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. *या ऑनलाईन सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव सर्च केल्यावर, मतदान केंद्राचे जीपीएस लोकेशनसह माहिती उपलब्ध होणार आहे.* या माध्यमाद्वारे मतदारांना मतदान कोणत्या केंद्रात करावयाचे आहे, मतदार यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक ही वैयक्तिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

मतदान क्रमांक व मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांनी https:kdmc.localbody.org/Home/Voter_Search या *लिंकचा किंवा खालील QR Code चा* वापर करावा.

या सुविधेमुळे मतदारांना वोटर स्लिपवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि घर बसल्या आपापल्या मतदान केंद्राची माहिती जीपीएस लोकेशनसह सहजरित्या उपलब्ध होईल. यामुळे मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

✨ **एक क्लिक… आणि तुमच्या मतदान केंद्राची संपूर्ण माहिती!**

🔍 **या सुविधेत काय मिळणार?**
➡️ तुमचे **नाव सर्च करताच**
📍 मतदान केंद्राची माहिती **GPS लोकेशनसह**
🧾 मतदार यादीतील **भाग क्रमांक व अनुक्रमांक**
📌 मतदान कोणत्या केंद्रात करायचे आहे याची संपूर्ण माहिती
👉 **फक्त एका क्लिकवर!**

🌐 **मतदान क्रमांक व मतदान केंद्र शोधण्यासाठी:**
🔗 [https://kdmc.localbody.org/Home/Voter_Search](https://kdmc.localbody.org/Home/Voter_Search)
📲 किंवा खाली दिलेल्या **QR Code** चा वापर करा

🚫 आता **वोटर स्लिपवर अवलंबून राहण्याची गरज नाही!**
🏠 घरबसल्या, मोबाईलवरच तुमच्या मतदान केंद्राची माहिती **सहज आणि त्वरित** मिळवा.

🤝 ही सुविधा म्हणजे
✅ नागरिकांच्या सोयीसाठी एक मोठे पाऊल
✅ मतदान प्रक्रिया अधिक **सुलभ व पारदर्शक** करण्याचा प्रयत्न

Exit mobile version