Site icon LNN

केडीएमसी निवडणूक : इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील उमेदवारांच्या जाहिरातींसाठी पूर्वप्रमाणन बंधनकारक

केडीएमसी निवडणूक विभागाकडून नियमावली जाहीर

कल्याण-डोंबिवली दि.23 डिसेंबर :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 साठी 15 डिसेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित किंवा प्रसिद्ध करायच्या जाहिरातींसाठी महापालिकेकडून पूर्वप्रमाणन घेणे अनिवार्य असल्याची माहिती देण्यात आली आहे. (KDMC Elections: Pre-Certification Mandatory for Candidates’ Advertisements on Electronic Media)

या जाहिराती प्रामाणिक करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 4 जणांची माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समितीही बनवण्यात आली आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Pointers)

• राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या “निवडणुकीच्या प्रयोजनार्थ प्रसार माध्यम संनियंत्रण – जाहिरात प्रमाणन आदेश 2025” नुसार ही अधिसूचना दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी जारी.

• अधिसूचनेनुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत
इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील जाहिरातींचे पूर्वप्रमाणन केले जाणार.

• महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठित.

• समिती सदस्य –
– सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. कल्याणजी घेटे
– अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड
– समन्वय अधिकारी संजय जाधव
– सदस्य सचिव : माहिती – जनसंपर्क अधिकारी, माधवी पोफळे

कोणत्या माध्यमांसाठी पूर्वप्रमाणन आवश्यक?
• डिजिटल व्हॅन
• दूरदर्शन
• उपग्रह वाहिन्या
• व्हिज्युअल डिस्प्ले
• इतर सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमे

अर्ज करण्याची अशी आहे प्रक्रिया…
• जाहिरात प्रसारणाच्या प्रस्तावित तारखेपूर्वी
किमान 5 कार्यदिवस आधी अर्ज आवश्यक..

• अर्ज उपलब्ध ठिकाण –
महापालिका भवन, तळमजला, केंद्रीय एक खिडकी कक्ष

• अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे –
– जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक प्रत (2 पेनड्राईव्ह)
– जाहिरात संहितेच्या 2 साक्षांकीत मुद्रित प्रती

• जाहिरात खर्च –
– पक्षाने केल्यास पक्षाच्या खर्चात
– उमेदवाराने केल्यास उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट

खालील आशयाच्या जाहिरातींना मनाई…
• भारतीय संविधान किंवा कायद्यांचे उल्लंघन
• राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांची पायमल्ली
• धर्म, जात, वंश, लिंग, भाषा आदींवरून तेढ निर्माण करणारा मजकूर
• प्रार्थनास्थळांचे छायाचित्रण
• कायदा व सुव्यवस्थेला आव्हान, हिंसाचारास प्रोत्साहन
• न्यायालय, व्यक्ती किंवा संस्थेची बदनामी
• राष्ट्रीय एकात्मतेला व सार्वभौमत्वाला बाधा
• संरक्षण दलांचे छायाचित्रण किंवा उल्लेख
• खोटे आरोप, खासगी आयुष्यात हस्तक्षेप
• नीतिमत्ता – सभ्यतेचा भंग
• अश्लीलतेला प्रोत्साहन

इतर भाषेतील जाहिरातींसाठी या अटी…
• मराठी, हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त भाषेतील जाहिरातींसाठी –
– संबंधित भाषेतील जाहिरातीच्या 2 इलेक्ट्रॉनिक प्रती
– मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील अचूक अनुवाद
– अनुवाद अचूक असल्याबाबत नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र अनिवार्य

अशी असेल निर्णय प्रक्रिया…
• अर्ज प्राप्त झाल्यानंतर
3 कार्यदिवसांत समितीकडून निर्णय

• जाहिरातीत सूचवलेल्या दुरुस्त्या किंवा बदल
बंधनकारकपणे अंमलात आणणे आवश्यक

नियमांचे काटेकोरपणे पालन करा, महापालिकेचे आवाहन…
महापालिका सार्वत्रिक निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आणि आदर्श आचारसंहितेनुसार पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version