Site icon LNN

केडीएमसी निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचा पॅनल क्रमांक 7 मधील मनसे उमेदवार ॲड. नयना प्रकाश भोईर यांना जाहीर पाठिंबा

कल्याण दि.12 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पॅनल क्रमांक 7 अ मधील मनसेच्या उमेदवार ॲड. नयना प्रकाश भोईर यांना आपला अधिकृत पाठिंबा दिला आहे. (KDMC Elections: Vanchit Bahujan Aaghadi Announces Official Support to MNS Candidate from Panel No. 7)

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल पावशे यांनी यासंदर्भातील पाठिंब्याचे पत्र ॲड. नयना भोईर यांना दिले असून त्याद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. केडीएमसीच्या निवडणुकीत सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या मनसे उमेदवार ॲड नयना भोईर या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

तसेच पॅनल क्रमांक 7 अ मधील सर्व मतदारांनी नयना प्रकाश भोईर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहनही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version