Home ठळक बातम्या केडीएमसी कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण; फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

केडीएमसी कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण; फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

 

डोंबिवली दि.20 जानेवारी :
कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या केडीएमसीच्या कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार डोंबिवलीमध्ये घडला.
डोंबिवलीतील घारडा सर्कलजवळ केडीएमसीची ही कारवाई सुरू असताना काही जणांनी या कारवाईला विरोध करत केडीएमसी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या हुज्जत घालण्याचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि मारहाण करण्यात झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात या फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचं सांगितलं.
तर फेरीवाल्यांनी केडीएमसी कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण अत्यंत चुकीची असून त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. तसेच फेरीवाल्यांवरील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा