कल्याण दि.9 एप्रिल :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी तसेच रक्तदात्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन होण्याचे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे. (KDMC Fire Brigade Organizes Blood Donation Camp; Citizens Urged to Participate in Large Numbers)
हे रक्तदान शिबिर येत्या शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत कल्याण (प.) येथील फडके मैदानाजवळील, अग्निशामक विभाग येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन ‘महा व्हिक्टरी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या ‘लाईफ लाईन ब्लड सेंटर’च्या सहकार्याने करण्यात आले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे निरोगी नागरिकांनी पुढाकार घेत रक्तदान करावे, असे आवाहन अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी केले आहे. आपत्कालीन सेवांसाठी २४ तास उपलब्ध असलेल्या या उपक्रमाद्वारे गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

