Home ठळक बातम्या चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या 3 पिल्लांचा केडीएमसी फायर ब्रिगेडने वाचवला जीव

चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या 3 पिल्लांचा केडीएमसी फायर ब्रिगेडने वाचवला जीव

 

कल्याण दि.27 ऑगस्ट :
सोसायटीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांचा जीव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवला. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली सोसायटीत आज सकाळी हा प्रकार घडला.

या सोसायटीच्या ड्रेनेज चेंबर्समध्ये कुत्र्याचे पिल्लू पडल्याची माहिती केडीएमसी फायर ब्रिगेडला सोसायटीतील रहिवाशांनी दिली. त्यानूसार केडीएमसी फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि या पिल्लाना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र चेंबरमधील अरुंद असणारी जागा आणि त्यात अडकलेल्या पिल्लाच्या ओरडण्यामुळे शेजारीच असणाऱ्या त्यांच्या आईबरोबरच फायर ब्रिगेडच्या जवानांचा जीवही कासावीस झाला होता. मात्र कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आणि आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून या कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केली. चेंबरमध्ये अडकलेल्या या पिल्लाला बाहेर काढण्यास आणखी थोडा जरी वेळ लागला असता या इवल्याशा पिल्लांच्या जीवावर बेतले असते अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. तर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या विनायक लोखंडे, राहुल भाकरे, निखिल इशाने, युवराज राठोड आदींच्या टीमने या ही कामगिरी केली.

या तीनही पिल्लांना ड्रेनेज चेंबरमधून बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले. तर हे सर्व बचाव कार्य सुरू असताना त्याशेजारीच या पिल्लांची आईही घुटमटळ होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक एक करून या पिल्लांना बाहेर काढल्यावर या चिमुकल्या पिल्लांच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद आणि भावना न बोलताही स्पष्टपणे समजत होत्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा