Site icon LNN

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी केडीएमसीकडून मदत कक्ष कार्यान्वित; येत्या काळात सर्वच प्रभागांतील सीएफसीमध्ये राबवणार संकल्पना

कल्याण डोंबिवली दि.1 डिसेंबर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव सोप्या पद्धतीने शोधता यावे, यासाठी शासनाने http://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (KDMC Launches Help Desk to Assist Citizens in Finding Their Names in the Voter List; Facility to Be Extended to All Ward-Level CFCs Soon)

तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही आपल्या अधिकृत संकेतस्थळावर https://kdmc.gov.in/ नागरिकांना NAME WISE किंवा EPIC NUMBER WISE मतदार यादीत नाव शोधण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

नागरिकांना ही प्रक्रिया अधिक सहज व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्रात विशेष मतदार मदत कक्ष (Help Desk) सुरू करण्यात आला आहे. या मदत कक्षाचा शुभारंभ महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

निवडणूक विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचे मदत कक्ष महापालिकेच्या सर्व प्रभागांतील नागरिक सुविधा केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. या कक्षांद्वारे नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधणे, EPIC क्रमांक पडताळणी, तसेच निवडणूक संबंधित मार्गदर्शन मिळणार आहे.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सिस्टम मॅनेजर प्रमोद कांबळे, निवडणूक विभागाचे अधीक्षक जयराम शिंदे, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version