Site icon LNN

महापौर पद आरक्षण सोडत ; कल्याण डोंबिवलीसाठी अनुसूचित जमाती प्रवर्ग (एसटी) जाहीर

कोणाच्या गळ्यात पडणार महापौर पदाची माळ

मुंबई दि. 22 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी अखेर आरक्षण आज जाहीर झाले आहे. कल्याण डोंबिवलीसाठी आता अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वाट्याला अनुसूचित जमाती प्रवर्गातील महापौर पद आले आहे. (KDMC Mayor Post Reserved for Scheduled Tribe Category)

त्यामुळे महापौर पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापौर पदासाठीची चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version