Home क्राइम वॉच सिव्हरेज प्लँटच्या सर्व्हेसाठी गेलेल्या पालिका अधिकारी-कर्मचऱ्याना मारहाण

सिव्हरेज प्लँटच्या सर्व्हेसाठी गेलेल्या पालिका अधिकारी-कर्मचऱ्याना मारहाण

कल्याण दि.14 नोव्हेंबर :
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात उभारण्यात येणाऱ्या सिव्हरेज प्लँटच्या सर्वेसाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये महापालिएकचे ज्युनिअर इंजिनीअरला जास्त दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास महापालिकेत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी सेनेच्या रवी पाटील यांनी दिला आहे.

केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात मलउदंचन (सिव्हरेज प्लांट) केंद्राचे काम सुरू आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे ज्युनिअर इंजिनीअर श्रीराम झोपळे, अनुरेखक मधुकर कोल्हे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इंजिनीअर शक्यवंशी त्यांचे सहाय्यक कर्मचारी आणि संबंधित ठेकेदाराची माणसे असे 7-8 जण गेले होते. त्यावेळी 8-10 अज्ञात व्यक्तींनी अचानक येऊन आम्हाला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची माहिती अनुरेखक मधुकर कोल्हे यांनी एलएनएनला दिली.

या मारहाणीत आणि धक्काबुक्कीत सर्व्हेअर श्रीराम झोपळे यांना जास्त दुखापत झाली असून त्यांच्यावर खडकपाडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मधुकर कोल्हे, राजीव सगर, एमजेपीचे शाक्यवंशी आणि ठेकेदाराच्या काही कर्मचाऱ्यांनाही दुखापत झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

दरम्यान या घटनेचा म्युनिसिपल।कर्मचारी सेनेने निषेध व्यक्त केला असून याप्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास उद्या महापालिकेत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा उपाध्यक्ष रवी पाटील यांनी दिला आहे. महापालिका अधिकारी कर्मचऱ्याना झालेल्या मारहाणीचा प्रकार हा अत्यंत निषेधार्ह आहे. अशाप्रकारे विरोध व्यक्त करणे अत्यंत चुकीचा असून यासंदर्भात आपण येणाऱ्या महासभेत आवाज उठवू अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*