Home कोरोना केडीएमसीतर्फे 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरु; याठिकाणी मिळणार केवळ कोविशील्डचा 2...

केडीएमसीतर्फे 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरु; याठिकाणी मिळणार केवळ कोविशील्डचा 2 रा डोस

 

कल्याण-डोंबिवली दि.5 मे :
गेल्या काही दिवसांपासून लस संपल्याने काहीसे चिंतातुर झालेल्या 45 वर्षांवरील नागरिकांचे कोवीड लसीकरण आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहे. शासनाकडून महापालिकेला ‘कोविशील्ड’ लसींचा पुरवठा प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे कोविशील्ड लसीचा 2 रा डोस घेणाऱ्यांसाठी महापालिका प्रशासनाने कल्याण आणि डोंबिवलीमधील 2 केंद्रांवर स्वतंत्रपणे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही ठिकाणी कोविशील्ड लसीचा केवळ 2 रा डोस असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. (KDMC resumes vaccination of citizens above 45 years; Only the 2nd dose of covishield will be available here)

कल्याण-डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीच्या उपलब्धतेअभावी लसीकरण थांबले होते. मात्र केडीएमसी आरोग्य विभागाला शासनाकडून ‘कोविशिल्ड लसी’चे काही डोस प्राप्त होणार असून आज सकाळी 11 वाजल्यानंतर महापालिकेच्या सर्व नियोजित केंद्रांवर लसीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला असून 2 ऱ्या डोससाठी पात्र असणाऱ्यांसाठी कल्याण डोंबिवलीतील प्रत्येकी एका केंद्रावर ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील नेतीवली दवाखान्याच्या शेजारी असणारे “प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र आणि डोंबिवली पूर्वेतील सावळाराम क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र येथे कोविशिल्डच्या 2ऱ्या डोसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोवीड लसींचा 2 रा डोस घेण्यास पात्र झालेल्या नागरिकांनी या दोन लसीकरण केंद्रावर सकाळी 11 नंतर लस घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.

तर कोवॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

१ कॉमेंट

Leave a Reply to GOPAL+PILLAI प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा