Home ठळक बातम्या मालमत्ता कर थकविल्याने निर्मल लाईफस्‍टाईलचे २२ फ्लॅट महापालिकेने केले सिल

मालमत्ता कर थकविल्याने निर्मल लाईफस्‍टाईलचे २२ फ्लॅट महापालिकेने केले सिल

 

कल्‍याण दि.11 एप्रिल :
कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्‍या ‘अ’ प्रभाग क्षेञाअंतर्गत येणाऱ्या वडवली येथील ‘निर्मल लाईफस्‍टाईल’ या विकासकाच्‍या २२ सदनिका आज अ प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल व त्‍यांच्‍या पथकाने जप्‍त करुन मोहोरबंद केल्‍या.

निर्मल लाईफस्‍टाईल या विकासकाकडे मोकळया भुखंडावर असलेल्‍या मालमत्‍ता कराच्‍या थकबाकीची रक्‍कम रु.१० कोटी ५० लाख इतकी आहे. त्‍या थकबाकीपोटी २२ सदनिका व कार्यालय आज जप्‍त करुन मोहोरबंद केल्‍या.

निर्मल लाईफस्‍टाईल हा विकासक थकबाकी असलेल्‍या मोकळया भुखंडापोटी थकीत रक्‍कम भरत नसल्‍याने, त्‍यांच्‍या मालमत्‍तेचा लिलाव २२ मार्च रोजी ठेवला होता. त्‍यास अनुसरुन त्‍यांनी लिलावाच्‍या दिवशी रु. ६ कोटी ५० लक्ष इतक्‍या रक्‍कमेचा धनादेश महापालिकेकडे सुपूर्द केला होता. मात्र त्‍यांनी दिलेला धनादेश बॅंकेतून न वटल्‍याची बाब कर निर्धारक व संकलक विनय कुलकर्णी यांनी आयुक्‍त गोविंद बोडके यांच्‍या निदर्शनास आणून दिली. विकासक पैसे भरण्‍यास टाळाटाळ करीत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यावर आयुक्‍त गोविंद बोडके यांनी निर्मल लाईफस्‍टाईलच्‍या सदनिका जप्‍त करुन मोहोरबंद करण्‍याचे निर्देश प्रभाग क्षेञ अधिकारी यांना दिले होते.

त्‍यानुसार आज अ प्रभाग क्षेञ अधिकारी सुधिर मोकल व त्‍यांचे पथकाने जप्‍त करुन मोहोरबंद केल्‍या. धनादेश न वटल्‍या प्रकरणी विकासकास निगोशीयेबल इन्‍स्‍ट्रुमेंन्‍ट अॅक्‍ट मधील तरतुदीनुसार नोटीस देण्‍यात आली आहे. विकासकाने विहीत मुदतीत रक्‍कम न भरल्‍यास त्‍याच्‍यावर फौजदारी गुन्‍हा दाखल करण्‍याचे आदेशही आयुक्‍तांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*