Home ठळक बातम्या केडीएमसीने कचरा व्यवस्थापन शुल्क तातडीने रद्द करावे – आमदार राजू पाटील यांची...

केडीएमसीने कचरा व्यवस्थापन शुल्क तातडीने रद्द करावे – आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण दि.26 मे  :
कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. या शुल्क आकारणीला भाजपपाठोपाठ आता मनसेनेही विरोध केला आहे. ही वसुली त्वरित रद्द करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

आमदार पाटील यांनी यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून त्याद्वारे त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली आहे. महिन्याला 50 रुपये आणि वर्षाला 600 रुपये कचरा उचलण्याचे शुल्क नागरिकांना द्यावे लागणार आहेत. ही करवसुली एप्रिल २०२१ पासून महापालिकेने सुरू केली आहे. महापालिका कचरा वर्गीकरणासाठी शून्य कचरा मोहीम मे २०२० पासून महापालिका हद्दीत राबवीत आहे. कचरा वर्गीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी झालेली नसून कचराकुंड्या हटविल्याने नागरिक कुठेही रस्त्यावर कचरा टाकत आहेत, महापालिकेचे कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी सुरू नाहीत तर काही प्रकल्प निर्माणाधीन असल्याने अशा प्रकारचा कर वसूल करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे. पालिका हद्दीतील २७ गावांचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. ही गावे महापालिकेतून वगळली जातात तर कधी महापालिकेत समाविष्ट केली जातात. या सरकारच्या धरसोडवृत्तीमुळे या गावातील कचराप्रश्न कायम असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा