Home Uncategorised केडीएमसीने वलीपीर रोडवर टाकलेला भराव काढावा; अन्यथा कायदेशीर कारवाई – दक्ष नागरिकाचा...

केडीएमसीने वलीपीर रोडवर टाकलेला भराव काढावा; अन्यथा कायदेशीर कारवाई – दक्ष नागरिकाचा इशारा

 

कल्याण दि.21 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून केडीएमसीकडून दगड मातीचा भराव टाकण्यात येत आहे. कल्याण पश्चिमेच्या वलीपीर रोड भागातही अशाच प्रकारे खड्डे भरण्यात आले असून असून केडीएमसीने दगड मातीचा हा भराव हटवला नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा दक्ष नागरिक उजैर नजे यांनी केडीएमसीला बजावलेल्या नोटीसीद्वारे दिला आहे. उजैर नजे हे कल्याण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाकीर नजे यांचे नातू आहेत.

केडीएमसीच्या ‘क’ प्रभागक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वलीपीर रोडची खड्ड्यांमूळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून केडीएमसीने दगडमातीचा भराव यावर टाकण्यात आला असून त्यामुळे तर हा रस्ता वाहन चालकांबरोबरच चालणाऱ्यांसाठीही धोकादायक झाल्याचे उजैर नजे यांनी म्हटले आहे. तसेच केडीएमसीकडून रस्ता न खणता आहे त्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाते किंवा दगडमातीचा भराव टाकला जातो. ज्यामुळे रस्त्याची उंची लक्षणीयरित्या वाढली असून शेजारील घरं आणि इमारती परिसर सखल भाग झाला आहे. परिणामी पावसाळ्यात या भागातील गटारे आणि ड्रेनेजचे घाण पाणी उलटून इथल्या लोकांच्या घरात शिरून नुकसान होत असल्याचे नजे यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने दगडमातीचा भराव काढण्यासह इथले रस्तेही खणून पूर्णपणे नविन बनवावे आणि गटार – ड्रेनेजची उंचीही योग्य प्रमाणात बनवण्याची मागणी करत तसे न झाल्यास केडीएमसीविरोधात कायदेशीर कारवाईचा इशाराही उजैर नजे यांनी आपल्या नोटीसीत दिला आहे.

यावर आता केडीएमसी प्रशासन नेमकी काय कार्यवाही करते हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

मागील लेखगुडन्यूज : डोंबिवलीतील ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ पुढच्या महिन्यात होणार सुरू
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 65 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा