Home ठळक बातम्या 27 गावातील अनधिकृत इमारतींवर महापालिकेची धडक कारवाई

27 गावातील अनधिकृत इमारतींवर महापालिकेची धडक कारवाई

कल्याण दि. 22 नोव्हेंबर :
गेल्या आठवड्यात शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेने आता अनधिकृत बांधकामांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यानुसार 27 गावातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास महापालिकेने आजपासून सुरुवात केली.

 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाचा मुद्दा वारंवार गाजत आहे. गेल्या आठवड्यात लोकांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई केली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांवरही कारवाई लवकरच कारवाई केली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार आज 27 गावातील आडीवली, ढोकाळी आणि पिसवली परिसरात असणाऱ्या अनधिकृत इमारतींवर धडक कारवाई करण्यात आली. जेसीबी, पोकलन मशीनच्या साहाय्याने ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या उपस्थितीत आणि अनधिकृत बांधकाम विभागप्रमूख सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली.

येत्या काळात केवळ 27 गावातीलच नव्हे तर महापालिका क्षेत्रातील इतर ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवरही हातोडा पडणार असल्याचे पालिका आयुक्त बोडके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*