Home कोरोना केडीएमसी उद्यापासून हेल्थ केअर, फ्रंटलाईन वर्कर्ससह 60 वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिकांना देणार बूस्टर...

केडीएमसी उद्यापासून हेल्थ केअर, फ्रंटलाईन वर्कर्ससह 60 वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिकांना देणार बूस्टर डोस

 

2रा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे झालेल्यांना मिळणार बूस्टर

कल्याण डोंबिवली दि.9 जानेवारी :
कोवीडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्यापासून म्हणजेच सोमवार 10 जानेवारी 2022 पासून हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना केडीएमसी आरोग्य विभागामार्फत प्रिकॉशन अर्थातच बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना 10 जानेवारी 2022* पासून प्रिकॉशन डोस देण्यात येईल. संबंधित लाभार्थ्याचे दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असावेत.

सर्व हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर, ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा कमी आहे आणि सिटीझन या प्रवर्गात दुसरा डोस घेतला असेल अशा लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोससाठी पात्र होण्यासाठी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अशा व्यक्तींचे लसीकरण फक्त शासकीय लसीकरण केंद्रावर ऑनसाईट पद्धतीने उपलब्ध असेल.

60 वर्ष वा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने 10 जानेवारी 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात येईल. प्रिकॉशन डोस घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याचे दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असावेत आणि त्यांना त्यांच्या डॉक्टराचे परवानगी असलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

सर्व नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी विनामूल्य लस देण्यात येईल.

प्रिकॉशन डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कोविन अँपमध्ये नोंदणी आणि ऑनस्पॉट वॉक- इन सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा