Home क्राइम वॉच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेताना पकडले

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेताना पकडले

कल्याण दि.27 डिसेंबर :
आपल्या अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीमूळे कल्याण डोंबिवली महापालिका पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेणाऱ्या प्रभागक्षेत्र अधिकाऱ्याला ठाणे अँटी करप्शन युनिटने रंगेहात पकडले. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे खाण्याचा भसम्या रोग झाला की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शरद रामचंद्र पाटील असे या प्रभागक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून ते पालिकेच्या आय वॉर्ड प्रभाग क्रमांक 9 चे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रभागक्षेत्रात माणेरे-चिंचपाडा येथे बांधकाम झालेल्या अनधिकृत चाळींवर कारवाई न करण्यासाठी पाटील यांनी बांधकाम व्यवसायिकाकडे 80 हजार रुपयांची मागणी केली होती. यापैकी 25 हजारांचा पहिला हफ्ता घेताना ठाणे अँटी करप्शन विभागाने पाटील यांना पालिकेच्या कार्यालयात रंगेहात पकडले.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत 34 जणांना आतापर्यंत लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यात आता शरद पाटील यांची भर पडली असून वारंवार घडणाऱ्या या घटनांवरून कल्याण डोंबिवली महापालिकेत भ्रष्टाचार किती बोकाळला आहे आणि तो अधिकारी कर्मचाऱ्यांच्या किती अंगवळणी पडला आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*