Home क्राइम वॉच 15 हजारांची लाच घेताना केडीएमसीच्या प्रभाग अधिकाऱ्याला पकडले

15 हजारांची लाच घेताना केडीएमसीच्या प्रभाग अधिकाऱ्याला पकडले

कल्याण दि.15 मार्च :

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘क प्रभागक्षेत्र आधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला लाच घेताना ठाणे अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. अनाधिकृत बांधकाम प्रकरणात तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार आज संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली.
केडीएमसीचे ” क” प्रभागक्षेत्र आधिकारी भागाजी भांगरे आणि कर्मचारी सुहास मढवी अशी दोघांची नावे आहेत. लाच घेतना सोमवारी संध्याकाळी कार्यालयात ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ठाणकर पाडा परिसरातील बांधकाम प्रकरणामध्ये 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. ही 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना प्रभाग अधिकारी भांगरे आणि सुहास मढवी यांना अँटी करप्शनने रंगेहात पकडले. त्यामूळे केडीएमसी आणि प्रशासनामधील बोकाळलेला भ्रष्टाचार याची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा