केडीएमटीकडून नविन चकाचक 'स्मार्ट बसस्टॉप' उभारण्यास सुरुवात

   

  कल्याण दि. 1 मार्च :
  स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत (smart city project) कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम (kalyan dombivli municipal transport) अर्थातच केडीएमटीतर्फे चकाचक अशी ‘स्मार्ट बसस्टॉप’ उभारण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण पश्चिमेत उभारण्यात आलेल्या चकाचक अशा दोन बसथांब्यांचे नुकतेच परिवहन सभापती मनोज चौधरी आणि परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांच्या प्रमूख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
  तब्बल दोन दशकांपूर्वी सुरू झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम (kalyan dombivli municipal corporation) सुरू झाला आहे. त्यामूळे शहरात कित्येक ठिकाणी या सेवेचे बसथांबे अत्यंत दयनीय अवस्थेत दिसत आहेत. तर काही ठिकाणचे बसथांबेही गायब झाल्याचे दिसत होते. मात्र कल्याण डोंबिवली शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर याठिकाणी सुशोभीकरणाचे अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केडीएमटीच्या 150 स्मार्ट बसथांब्याची उभारणी केली जाणार असल्याची माहिती परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी दिली.कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली आणि भवानी चौक परीसरात उभारण्यात आलेल्या पहिल्या स्मार्ट बसथांब्यांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी परिवहन सदस्य संजय पावशे, कल्पेश जोशी,सुनील खारुक, स्वप्निल काटे, बंडू पाटील, संजय मोरे, दिनेश गोर, स्थानिक लोकप्रतिनिधी शालिनीताई वायले, समाजसेविका अनघा राजेंद्र देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
  दरम्यान केडीएमटीचे बसथांबे चकाचक होऊ लागले असताना आता केडीएमटीची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येऊन लोकांना या स्मार्ट बसस्टॉपप्रमाणेच चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

  This is also an ideal time to have one. cialis generic south africa In any case the risks to the baby can be significant.

  तुमची प्रतिक्रिया लिहा

  तुमची कंमेंट लिहा
  तुमचे नाव लिहा