Home ठळक बातम्या नायलॉनच्या मांज्यामुळे ‘किंगफिशर’ जखमी; पक्षीमित्राने दिले जीवदान

नायलॉनच्या मांज्यामुळे ‘किंगफिशर’ जखमी; पक्षीमित्राने दिले जीवदान

कल्याण दि.8 जानेवारी :
पतंग उडवताना वापरला जाणारा नायलॉनचा मांज्या हा अनेक वेळा पक्षांच्या जीवावर बेतत आहे. अशाच प्रकारे नायलॉनच्या मांज्यामुळे एक खंड्या (किंगफिशर) पक्षी जखमी झाल्याची घटना कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा, लक्ष्मी नारायण कॉलनी येथे घडली. येथील रहिवासी विजय मनियार यांना खंड्या पक्षी जखमी अवस्थेत सापडल्यानंतर त्यांनी पक्षीमित्र महेश बनकर यांना फोन करत याबद्दल माहिती दिली. बनकर यांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत त्या पक्ष्याला औषध उपचारासाठी आपल्या घरी आणले. पतंगाच्या नायलॉन मांजामुळे किंगफिशर पक्षाच्या पंखांना इजा झाली असून त्याच्यावर उपचार झाल्यावर त्याला सोडून देणार असल्याचे पक्षी मित्र महेश बनकर यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा