Home ठळक बातम्या कल्याणातील प्रस्तावित टाऊनशीपचे काम वर्षभरात सुरू होणार”

कल्याणातील प्रस्तावित टाऊनशीपचे काम वर्षभरात सुरू होणार”

कल्याण दि.17 नोव्हेंबर :
स्मार्टसिटी कार्यक्रमांतर्गत कल्याणात होणाऱ्या टाऊनशीपच्या प्रत्यक्षात कामाला वर्षभरात सुरुवात होईल अशी माहिती आज झालेल्या बैठकीनंतर देण्यात आली. स्मार्टसिटी योजनेंतर्गत कोरियाच्या शिष्टमंडळाने आज कल्याण डोंबिवली महापालिकेला भेट देत प्रस्तावित जागेची पाहणी केली. तसेच काळा तलाव येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देत आदरांजलीही वाहिली.
कल्याण पश्चिमेतील 250 हेक्टर जागेमध्ये ही प्रस्तावित टाऊनशीप उभारली जाणार आहे. स्मार्टसिटी योजनेंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पासाठी राज्य शासनाने कोरिअन कंपनीशी सहकार्य करार केला आहे. त्यानूसार कोरिअन सरकारमधील कॅबिनेट दर्जाचे अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सापर्डे येथील प्रस्तावित जागेची पाहणी करीत त्याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच काळा तलाव येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकालाही भेट देत आदरांजली वाहिली.
यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कोरिअन कंपनीचे सीईओ पार्क सांग वु यांनी सांगितले की कल्याण शहराची भौगोलिक परिस्थितीचा विचार करता या शहराची आम्ही प्रामुख्याने निवड केल्याचे सांगितले.
तर येत्या या टाऊनशीपसाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वर्षभरात त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. दरम्यान महापौर राजेंद्र देवळेकर आणि तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी पुढाकार घेत केलेल्या प्रयत्नांमुळे दुसऱ्या टप्प्यात कल्याण-डोंबिवलीचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे.
यावेळी उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधीपक्षनेते मंदार हळबे, भाजप गटनेते वरुण पाटील, माजी सभागृहनेते सचिन बासरे, अरविंद मोरे, रवींद्र कपोते यांच्यासह पालिकेचे अनेक पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*