Home Uncategorised LNN :- करिअर मंत्रा…

LNN :- करिअर मंत्रा…

  • राज्य मानवी हक्क आयोगामध्ये कंत्राटी पदांच्या 3 जागा
    राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथील कार्यालयात स्वीय सहायक (०२) व उच्चश्रेणी लघुलेखक (०१) या कंत्राटी पदासाठी पदवीधर उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावे. अधिक माहितीसाठी दिनांक 3 मे 2016 रोजीचा मुंबई लोकसत्ताचा अंक पाहावा.

 

  • न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये वैज्ञानिक सहायकाच्या 49 जागा…
    न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या आस्थापनेवर कंत्राटी पद्धतीने वैज्ञानिक सहायकाच्या (49) जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीचा दिनांक 5 मे 2016 रोजी सकाळी 10.30 ते 4.30 असा आहे. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in किंवाdfsl.maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा किंवा दिनांक 3 मे 2016 रोजीचा मुंबई लोकसत्ताचा अंक पाहावा.

 

  • मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अधिकारी पदाच्या ३ जागा
    मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये चीफ लॉ ऑफिसर (१ जागा), सीनि. डेप्यू. चीफ मेडिकल ऑफिसर (रेडिओलॉजी) (१ जागा), सीनि. डेप्‍यू. चीफ मेडिकल ऑफिसर (पॅथॉलॉजी व बॅक्टेरिओलॉजी) (१ जागा) या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मे, २०१६ आहे. अधिक माहितीwww.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(माहिती सौजन्य :- महान्यूज) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*