Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी

कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी

 

कल्याण पूर्वेत इमारतीची संरक्षण भिंत कोसळली ;सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

कल्याण-डोंबिवली दि.9 जुन :
कल्याण डोंबिवली परिसरात मंगळवारी मध्यरात्री पासून पावसाने हजेरी लावली आहे. कधी जोरात तर कधी संततधार पडणाऱ्या पावसामुळे कल्याण पूर्वेत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नसून भिंतीमुळे रस्ताही खचला आहे.

ठाण्यासह कोकणच्या चारही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानूसार काल मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानेही खबरदारी म्हणून विविध उपाय योजना लागू केल्या आहेत.

फोटो – माहिती सौजन्य :- प्रमोद तांबे, एलएनएन सिटीजन रिपोर्टर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा