Home ठळक बातम्या बारावे घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवासी संतप्त तर कचऱ्याच्या गाड्या जाळण्याचा मनसेचा इशारा

बारावे घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवासी संतप्त तर कचऱ्याच्या गाड्या जाळण्याचा मनसेचा इशारा

 

कल्याण दि. 10 ऑगस्ट :
काही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीमुळे बंद असणाऱ्या बारावे येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. तर हा प्रकल्प सुरू होईपर्यंत इकडे कचरा न टाकण्याची मागणी करत गाड्या आल्यास त्या जाळण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

कल्याण पश्चिमेतील बारावे येथे महापालिकेतर्फे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. साधारणपणे 3 महिन्यांपूर्वी या घनकचरा प्रकल्पाला लागलेल्या आगीमध्ये या प्रकल्पातील मशिनरी बंद पडली आहे. मात्र त्यानंतरही या प्रकल्पात घनकचरा टाकला जात असून कचरा प्रक्रिया ठप्प असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत महापालिकेला वारंवार तक्रारी करूनही पालिकेकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाहीये. त्याविरोधात आज संतप्त नागरिकांनी या घनकचरा प्रकल्पाबाहेर जमा होत जोरदार घोषणाबाजी केली.
तर मनसेनेदेखील याप्रश्नी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकल्पातील मशिनरी बंद असल्याने सध्या या परिसराला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत या प्रकल्पातील मशिनरी सुरू होत नाही तोपर्यंत या प्रकल्पात कचऱ्याच्या गाड्या आणू नका. त्यानंतरही गाड्या आल्यास त्या पेटवून देण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला.

मागील लेख…आणि महाराष्ट्र नगर येथील नागरिकांची झाली चिखलातून सुटका
पुढील लेखस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी कल्याणात निघणार अभूतपूर्व ‘तिरंगा रॅली’

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा