Home Uncategorised कल्याण पूर्वेतील रस्ता रुंदीकरणविरोधात स्थानिकांचा पालिकेवर धडक मोर्चा

कल्याण पूर्वेतील रस्ता रुंदीकरणविरोधात स्थानिकांचा पालिकेवर धडक मोर्चा

 

कल्याण दि.18 जानेवारी :

कल्याण पूर्वेत करण्यात येणाऱ्या यु टाईप रस्ता रुंदीकरणाआधी बाधितांचे पुनर्वसन धोरण ठरवावे या मुख्य मागणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर कल्याण पूर्वेतील हजारो नागरिकांनी मोर्चा काढत धडक दिली.

कल्याण पूर्वेत यु टाईप ८० फुट रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव असून यासाठी मोजणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी रोखले होते. पुनर्वसन धोरण व आराखडा न ठरवता रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव आणल्याने याचा निषेध करण्यासाठी पुनर्वसन कृती समिती कल्याण पूर्वच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर येथून या मोर्चाला सुरवात झाली. येथील स्काय वॉक वरून चालत येत पश्चिमेतील स्टेशन परिसर, बाजारपेठ, शिवाजी चौक मार्गे हा मोर्चा पालिकेवर धडकला.

डी.पी. मंजूर नसतांना ८० फुट रुंदीकरण प्रस्ताव असून यामुळे १८०० रहिवासी तसेच दुकानदार बेघर होणार आहेत. काटेमानिवली ते गणपती चौक ते सिद्धार्थ नगर ते म्हसोबा चौक ते तिसगाव नाका या रस्त्या लगतच्या रहिवासी इमारती, घरे, दुकाने २० फुट दोन्ही बाजूला तुटणार आहेत. १८ वर्षापासून याच रस्ता रुंदीकरणात बेघर केलेल्या कुटुंबांचे अद्याप पुनर्वसन केलेले नाही. आम्हाला विकास हवा पण १८०० कुटुंबियांना उद्ध्वस्त करून नको त्यामुळे रस्ता वाढवणार असाल तर आधि पुनर्वसन धोरण काय ? व कसे करणार याबबात सर्वकष आराखडा दिल्या शिवाय रस्ता रुंद करु देणार नाही असा इशारा पुनर्वसन कृती समिती कल्याण पूर्वने पालिकेला दिला आहे.

यु टाईप रस्ता रुंदीकरणासाठी पुनर्वसन धोरण आणि सर्वकष आराखडा जाहिर करावा आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, १८ वर्षापासुन रुंदीकरणात बाधीत असलेल्या बेघर कुटुंबांचे आधी पुनर्वसन करावे, रस्त्यालगतच्या रहिवासी, दुकानदार यांना भूविकासात, आहे त्याच ठिकाणी सामावुन घ्यावे अशा बंधनकारक अटी, नियम पालिकेने विकासक बिल्डर्सला घालाव्यात या मागण्या यावेळी मोर्चेकरांनी केल्या. कल्याण पुर्वेतील रस्ता रुंदीकरणात बाधीत बांधवांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही अनेक कुटुंब बेघर केले आहेत त्याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या धुळ खात पडलेल्या मालमत्तेचा ४ फ्लॅट चा ताबा घेण्यार असल्याचे यावेळी उदय रसाळ यांनी सांगितले.

दरम्यान जोपर्यंत पुनर्वसन धोरण निश्चित करीत नाही तोपर्यंत ही रस्ता रुंदीकरण कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्याची माहिती मोर्चेकऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*