Home नागरी समस्या पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने लोकल सेवा विस्कळीत; कल्याण आणि ठाकुर्ली स्टेशन...

पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने लोकल सेवा विस्कळीत; कल्याण आणि ठाकुर्ली स्टेशन दरम्यानची घटना

(फोटो सौजन्य : राजेंद्र अकलेकर, वरिष्ठ पत्रकार)

कल्याण दि.4 एप्रिल :
लोकलचा पेंटोग्राफ विजेच्या ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान जलद मार्गावर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. (
Local service disrupted as local pantograph caught in overhead wire; Incident between Kalyan and Thakurli stations)

ठाकुर्लीच्या पुढे आणि पत्रीपुलाच्या अगोदर ही लोकल आली असताना अचानक ओव्हरहेड वायरमध्ये पेंटोग्राफ अडकला आणि एकच गोंधळ उडाला. काही काळ प्रवाशांना नेमके काय झाले हेच समजले नाही. मात्र बराच वेळ होऊनही लोकल जागची हालत नसल्याने अनेकांनी थेट रेल्वेमार्गावर उतरत चालत आपापले स्टेशन गाठले.
दरम्यान या तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेला पेंटोग्राफ काढण्यात आला असून ही लोकलही आता तिथून हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. तर पेंटोग्राफ अडकल्याने बिघाड झालेली ओव्हरहेड वायर पूर्वपदावर आणण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान आधीच एकीकडे सूर्यदेव अक्षरशः आग ओकत असताना लोकल सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा