Home ठळक बातम्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं ; महाराष्ट्रात 11 ते 29 एप्रिलदरम्यान चार टप्प्यांत...

लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं ; महाराष्ट्रात 11 ते 29 एप्रिलदरम्यान चार टप्प्यांत मतदान

*लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, देशभरात आचारसंहिता लागू* *महाराष्ट्रात 11 ते 29 एप्रिलदरम्यान चार टप्प्यांत मतदान*

नवी दिल्ली दि.10 मार्च :
देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. देशभरात एकूण 7 टप्प्यात निवडणूक होणार असून महाराष्ट्रात 4 टप्प्यामध्ये होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

*”महाराष्ट्रात या दिवशी होणार मतदान”*

1ला टप्पा 11 एप्रिल – महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान

2रा टप्पा (18 एप्रिल) – महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान

3रा टप्पा 23 एप्रिल – महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान

4था टप्पा (29 एप्रिल)- महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान

*देशभरात 7 टप्प्यात यादिवशी होणार मतदान…*

पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्यं
दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं
तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं
चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं
पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं
सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं
सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं
मतमोजणी : 23 मे 2019

*निवडणूक आयोगाचे महत्वाचे मुद्दे…*

– फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर

– मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येणार

– निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिकही आयोगाकडे थेट तक्रार करु शकणार, अॅपवरील तक्रारदाराचं नाव गुप्त राहणार, 100 मिनिटांच्या आत अशा तक्रारींना प्रतिसाद आयोगाचे अधिकारी देणार.

– रात्री दहानंतर प्रचाराला मुभा नाही, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही

– लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, देशभरात आचारसंहिता लागू, आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाई

– ईव्हीएमवर मतदाराचा फोटो असणार, सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिन, दहा लाख पोलिंग बूथ

– 1950 या टोल फ्री क्रमांकावर मतदानाशी निगडीत सर्व माहिती मतदारांना मिळणार, अॅपवरही तक्रारीची सुविधा

– देशातील मतदार 90 कोटीच्या घरात, 2014 च्या तुलनेत सात कोटींनी वाढ, 18-19 वर्षे वयोगटातील दीड कोटी, तर 1.60 कोटी नोकरदार मतदार

– सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा, धार्मिक सण-उत्सव यांचा विचार करुन लोकसभा निवडणुकांच्या तारखांचं वेळापत्रक

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*