Home ठळक बातम्या लोकसभा निवडणुक ; मुंबई- ठाण्यात यादिवशी होणार मतदान

लोकसभा निवडणुक ; मुंबई- ठाण्यात यादिवशी होणार मतदान

मुंबई  दि.10 मार्च :

देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी राज्यातील मतदारसंघनिहाय निवडणुकांची माहिती दिली.

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

*पहिला टप्पा*– 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान

*दुसरा टप्पा* –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान

*तिसरा टप्पा*– 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान

*चौथा टप्पा* – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान

 

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 7 जागांसाठी मतदान

*वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम*

महाराष्ट्र – दुसरा टप्पा –18 एप्रिल 10 जागांसाठी मतदान

*बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर*

महाराष्ट्र- तिसरा टप्पा – 23 एप्रिल 14 जागांसाठी मतदान

*जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले*

महाराष्ट्र- चौथा टप्पा – 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान

*नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई*

*अर्ज भरण्याची तारीख – 18 मार्चपासून*

*अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च*

*अर्ज छाननी – 26 मार्च*

*अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 28 मार्च*

*निकाल – 23 मे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*