Home ठळक बातम्या सुभेदार वाडा गणेशोत्सव मंडळातर्फे कल्याणातील गणेश मंदिरात महाआरती

सुभेदार वाडा गणेशोत्सव मंडळातर्फे कल्याणातील गणेश मंदिरात महाआरती

कल्याण दि.12 फेब्रुवारी :

सुभेदार वाडा गणेशोत्सव मंडळातर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा एक उपक्रम म्हणून माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कल्याणातील पारनाका गणेश मंदिरात आरती करण्यात आली. या आरतीसाठी कल्याण पश्चिमेचे आमदार श्री नरेंद्र पवार, शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समितीचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष भालचंद्र जोशी, मयुरेश आगलावे, कार्याध्यक्ष ॲड सुरेश पटवर्धन, सल्लागार राम जोशी तसेच मंडळाचे महिलाआणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती पूजन करुन आरतीला प्रारंभ करण्यात आला. उपाध्यक्ष भालचंद्र जोशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

सुभेदार वाडा गणेशोत्सव मंडळ यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी अर्थात 125 वे वर्ष साजरे करत आहे. शहरातील नागरिकांना या उत्सवाची अधिकाधिक माहिती व्हावी या उद्देशाने शतकोत्तर रौप्य महोत्सवी समितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अंतर्गत माघी गणेशोत्सवानिमित्त आरती करण्यात आली. रविवार दि 10 फेब्रुवारी रोजी खडक पाडा परिसरातील कैलास पार्क गणपती मंडळातही आरतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच बरोबर उत्सवाची माहिती देणारा एक तरंगता फुगा टिळक चौकातील गायन समाजाच्या इमारतीवर उभारण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठीही या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*