Home ठळक बातम्या शहरांतील असुविधांचा वनवास संपण्यासाठी डोंबिवलीतील राम मंदिरात मनसेची महाआरती

शहरांतील असुविधांचा वनवास संपण्यासाठी डोंबिवलीतील राम मंदिरात मनसेची महाआरती

डोंबिवली दि.24 नोव्हेंबर :
राम मंदिराच्या मागणीसाठी एकीकडे शिवसेनेची अयोध्यावारी होत असताना दुसरीकडे मात्र कल्याण डोंबिवलीतील असुविधांचा वनवास संपावा याकरीता डोंबिवली शहर मनसेतर्फे श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. कल्याण डोंबिवलीतील सत्ताधाऱ्यांना इथले प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी देवो यासाठी श्रीरामाला यावेळी साकडे घालण्यात आले.

राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामध्ये कल्याण डोंबिवलीतूनही शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. हाच धागा पकडत आज डोंबिवली शहर मनसेतर्फे येथील बाजीप्रभू चौकातील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली.

 

राम मंदिर उभारणीला आमचा कोणत्याही प्रकारे विरोध नाही, राम मंदिर झालेच पाहिजे. मात्र कल्याण डोंबिवलीतील असुविधा सोडवण्यात इथले सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. श्रीरामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता. मात्र सत्ताधाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीकरांच्या माथी मारलेला असुविधांचा वनवास 24 वर्षानंतरही संपण्याचे नाव घेत नाही. वर्षांपास मारलेलात्यांना किमान आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात तरी इथल्या समस्या सोडवण्याची सद्बुद्धी मिळावी यासाठी प्रभुरामाला साकडे घालण्यात आल्याची प्रतिक्रिया मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी दिली.

या महाआरतीमध्ये मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, गटनेते प्रकाश भोईर, प्रल्हाद म्हात्रे ,राहुल कामत, सागर जेधे, मंदा पाटील, सरोज भोईर, स्मिता भणगे यांच्यासह अनेक पदाधिकारी महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*