Home ठळक बातम्या महाराष्ट्र बंद : कल्याण पश्चिमेत राष्ट्रवादीकडून निदर्शने, रास्ता रोकोचाही प्रयत्न

महाराष्ट्र बंद : कल्याण पश्चिमेत राष्ट्रवादीकडून निदर्शने, रास्ता रोकोचाही प्रयत्न

कल्याण दि.11 ऑक्टोबर :
लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी कल्याण पश्चिमेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने तसेच रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे कालच जाहीर केले होते. त्यानूसार आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने सुरू केली. त्यानंतर रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडत राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोकोचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी निदर्शने करणाऱ्यांची समजूत काढत त्यांना बाजूला हटवले.
दरम्यान या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मागील लेखउद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा, अन्यथा नुकसान झाल्यास तुम्हीच जबाबदार – कल्याण डोंबिवली काँग्रेसचा व्यापाऱ्यांना इशारा
पुढील लेखआवाहन करूनही रिक्षा बंद न केल्याने कल्याणात शिवसैनिक संतप्त

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा