Home क्राइम वॉच घरफोडी, दरोडा,चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगार महात्मा फुले पोलिसांकडून जेरबंद

घरफोडी, दरोडा,चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगार महात्मा फुले पोलिसांकडून जेरबंद

 

कल्याण दि.17 सप्टेंबर :
महाराष्ट्राच्या वेगवेगळया जिल्हयात ज्वेलर्स दुकानातील चोरी, दरोडे, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी अशा कित्येक गंभीर गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगाराला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी जेरबंद केले आहे. शिवासिंग विरसिंग दुधानी (२८) राहणार आंबवली असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने 18 जून रोजी कल्याणच्या रामबाग परिसरात पूनम सिंग (57) वर्षे यांची सोनसाखळी चोरून पोबारा केला होता.

याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याणजी घेटे यांनी त्याच्या शोधासाठी खास पथकाची नेमणूक केली होती. या पथकाने तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलची तांत्रिक माहिती आणि आपल्या खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.

विशेष म्हणजे दुधानी हा पॅरोलवर असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आंबिवली रेल्वे स्टेशन परीसरात पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. या अट्टल गुन्हेगाराने पॅरोलवर असल्यापासून साथीदारांच्या मदतीने रसायनी, वडकी, यवतमाळ, वडनेर, वर्धा, मौदा, नागपुर, जवाहरनगर, भंडारा, साकोली, लावणी, भंडारा आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्स दुकानं फोडून चोरी केली आहे. तर आतापर्यत तब्बल ११ गंभीर गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना पाहीजे होता अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

तर त्याच्यावर साथीदारासह दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, मोटारसायकल चोरी अशा प्रकारचे 23 गुन्हे दाखल आहेत. तर दुधानीने त्याच्या साथीदारांसह कल्याण परीसरात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे दाखल चैन स्नॅचिंगच्या 4 गुन्ह्यांची कबुली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. या गुन्हयातील मंगळसूत्र, रोख रक्कम, रोडा कंपनीची सीबी शाईन मोटार सायकल असा एकूण 1 लाख 34 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे, निरीक्षक संभाजी जाधव, प्रदिप पाटील, सहाय्यक निरीक्षक दिपक सरोदे, देविदास ढोले, पोलीस हवालदार निकाळे, चित्ते, भालेराव, शिर्के, पोलीस नाईक भोईर, मधाळे, हासे, टिकेकर, जाधव, भालेराव आदींच्या पथकाने या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात यश मिळवले.

मागील लेखराज्यातील मंत्र्यांनंतर आता केडीएमसी किरीट सोमय्यांच्या रडारवर; केडीएमसीमध्ये कोवीड काळातील कामांची काळी पत्रिका काढणार
पुढील लेखकल्याण पश्चिमेत गळतीमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट ; 1 जण जखमी, घराचे मोठे नुकसान

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा