Site icon LNN

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महेश गायकवाड यांच्याकडून ५ लाखांची आर्थिक मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मदतीचा धनादेश सुपूर्द; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

कल्याण | १९ ऑक्टोबर
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी महेश गायकवाड यांच्या वतीने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.(Mahesh Gaikwad Donates ₹5 Lakh to Support Drought-Hit Farmers)

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी समाजातील नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महेश गायकवाड यांच्या वतीने ही आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी महेश गायकवाड म्हणाले की, शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांवर संकट ओढवले असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, त्यांना आर्थिक आधार देणे आणि त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद व समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करणे, ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे.

संकटाच्या काळात गरजू शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे, हीच खरी माणुसकी आणि समाजसेवा आहे. शेतकरी बांधवांना या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Exit mobile version