Home ठळक बातम्या डोंबिवली पूर्व आणि एमआयडीसीच्या या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

डोंबिवली पूर्व आणि एमआयडीसीच्या या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

कल्याण डोंबिवली दि. १९ एप्रिल :

वीजवितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवली पूर्व आणि एमआयडीसी भागातील काही भागांचा वीजपुरवठा बुधवारी आणि गुरुवारी (वेगवेगळ्या वेळांमध्ये) बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

या भागात बुधवारी वीज नाही…
डोंबिवलीतील रामनगर फिडरवरील रामनगर पोलिस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांती नगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात बुधवारी २० एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद असेल.

या भागात गुरुवारी वीज नाही…
दत्तनगर फिडरवरील स्वामी शाळा, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जूना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगितावाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड, तुकाराम नगर फिडरवरील आयरे रोड, तुकाराम नगर, सुदामवाडी, आयरे नगर, पाटकर शाळा या भागात गुरुवारी २१ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच महावितरणच्या कल्याण पूर्व विभागात येणाऱ्या आजदे फिडरवरील आजदे, पाथर्ली, सागर्ली, एमआयडीसी कॉलनी, आजदेपाडा, जिमखाना रोड, शेलार नाका, इंदिरा नगर झोपडपट्टी, रेल्वे कॉलनी, त्रिमुर्ती नगर झोपडपट्टी भागात बुधवारी (२० एप्रिल) आणि २२ केव्ही टेम्पो नाका फिडर तसेच २२ केव्ही एमआयडीसी फिडर क्रमांक ११ वरील एमआयडीसी फेज दोनमधील अंशत: काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

देखभाल-दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या स्वंयचलित प्रणालीमार्फत संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे वीज बंदबाबत पूर्वकल्पना देण्यात येत असल्याची माहितीही महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

१ कॉमेंट

Leave a Reply to सुधीर प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा