Home ठळक बातम्या विद्या पाटील यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण मोफत करा – शिवसेनेची मागणी

विद्या पाटील यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण मोफत करा – शिवसेनेची मागणी

 

डोंबिवली, दि.12 जून :
रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील विद्या पाटिल यांच्या मुलींचं पुढील शिक्षण मोफत करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. डोंबिवली शहर शिवसेना शिष्टमंडळाने शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली मॉडेल शाळेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले.

काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्थानकात विद्या पाटील यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता. विद्या पाटील यांना 3 लहान मुली असून त्यातील दोन मुली डोंबिवलीच्या मॉडेल इंग्लिश हायस्कुलमध्ये शिकत आहेत. पाटील कुटुंबामध्ये त्या एकट्याच कमवत्या होत्या, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मॉडेल शाळा-कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ रवींद्र बांबर्डेकर यांची भेट घेतली. विद्या पाटील यांच्या मुली पूर्वा आणि मेधा यांचे 10 वी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण मोफत करण्याच्या मागणीचे निवेदन शाळा व्यवस्थापनाला दिले. त्यावर याबाबत पाटील कुटुंबियांना योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन शाळा व्यवस्थापनाने दिल्याचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.

यावेळी संजय पावशे, किशोर मानकामे,भैय्या पाटील, संतोष चव्हाण, सतीश मोडक, महिला संघटक कविता गावंड, मंगला सुळे, किरण मोंडकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा