Home ठळक बातम्या कल्याणात अर्धे डबे मागे ठेवून पुढे गेली पंचवटी एक्सप्रेस

कल्याणात अर्धे डबे मागे ठेवून पुढे गेली पंचवटी एक्सप्रेस

कल्याण दि.7 मार्च : 

कपलिंग तुटल्यामुळे मनमाड – मुंबई पंचवटी एक्स्प्रेस अर्धे डबे मागे ठेवून धावल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात घडला. कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान पत्रीपुल परिसरात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळेस जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून त्याचा धीम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

 

अर्धे मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसने कल्याण स्टेशन सोडले आणि गाडी पत्रीपुल परिसरात आली. मात्र पत्रीपुल ओलांडताच कपलिंग तुटल्याने इंजिनासह 2 डबे पुढे गेले आणि उर्वरित गाडीचे डबे पाठीमागेच राहिले अशी माहिती प्रत्यक्षदर्शी आणि एलएनएन सिटीजन रिपोर्टर रौनक तन्ना यांनी एलएनएनला दिली. या प्रकाराने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने गाडी थांबवली. मात्र याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून धीम्या मार्गावर त्याचा ताण आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*