Home क्राइम वॉच महागड्या बाईक चोरणारे सख्खे भाऊ गजाआड; चोरीच्या तब्बल 11 बाईक हस्तगत

महागड्या बाईक चोरणारे सख्खे भाऊ गजाआड; चोरीच्या तब्बल 11 बाईक हस्तगत

डोंबिवली दि.6 फेब्रुवारी :

महागड्या बाईकच्या चोरीप्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना अटक केली असून त्यांच्याकडून 11 महागड्या बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत.

योगेश महेश भानुशाली (30) आणि  मुकेश महेश भानुशाली (34) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार समीर उर्फ अक्रम सय्यद याचा पोलिस शोध घेत आहेत. डोंबिवलीतील मिलापनगर भागातून एक रॉयल इनफिल्ड बुलेट २७ जानेवारी रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश डांबरे यांच्या नेतृत्वाखाली भानुदास काटकर, संतोष भुंडरे, प्रतिम काळे, भगवान चव्हाण, दिलीप किरपण, अनिल घुगे, सुधाकर भोसले, सोपान काकड या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपींचा माग काढला. या दोन्ही भावांकडून पोलिसांनी 4 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 11 बाईक हस्तगत केल्या आहेत.

या चोरट्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2, तसेच विष्णूनगर, हिललाईन, मुंब्रा आणि नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी 1 अशा 11 बाईक लंपास केल्या आहेत. त्यांच्याकडून तपासात आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा